वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा संपूर्णपणे अत्याधुनिक दुग्धप्रकल्प पिंपळी खुर्द येथे उभारला आहे. या प्रकल्पाची क्षमता प्रति दिन १ लाख लिटर दूधाची आहे. या प्रकल्पामुळे चिपळूण शहरासह जिल्ह्य़ातील हजारो शेतकरी आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पातील दूध व दुग्धजन्य पदार्थ अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहेत. या प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आहेत.