प्रशांत बबन यादव
प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी प्रशांत यादव यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रशांत यादव यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत यादव यांची झालेली ही निवड चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.
" जोमाने कामाला लागा : शरद पवार " शरद पवार यांनी प्रशांत यादव यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केली. यावेळी पवार साहेबांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्वांनी जोमाने कामाला लागा, अशी सूचना केली. तसेच यावेळी त्यांनी वाशिष्ठी डेअरीच्या प्रगतीबाबतही यादव यांच्याकडे मोठ्या आपुलकीने विचारपूस केली.
